नांदेड : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. 3 एप्रिल रोजी दुपारी नांदेड शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे लोहा कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन, नांदेड व लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत त्यांच्याशी विविध
विषयावर चर्चा केली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई
श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे
महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, ट्वेंटीवन शुगरचे
व्हा. चेअरमन विजय देशमुख, केदार पाटील साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य
चंद्रसेन पाटील बाबासिंह ठाकुर आदीसह काँग्रेस पक्षाचे व शेतकरी कामगार
पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.