30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या  निवासस्थानी...

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या  निवासस्थानी दिली भेट

नांदेड:  प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी नांदेड
शहरानजीकच्या विष्णुपुरी येथील नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे
यांच्या इंदिरा निवासस्थानी भेट देऊन नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या
निवडणुकीबाबत त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव
चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव
पाटील बेटमोगरेकर, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख धारोजी
हंबर्डे, जयसिंग हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, बळवंत हंबर्डे, डॉ. विठ्ठल
पावडे आदी सह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR