लातूर : प्रतिनिधी
आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध विभागांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या एक्झिटिव्ह कमिटीवर तर राज्याचे प्रवक्ते म्हणून माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांची निवड झाल्याने मराठवाड्यातून व जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लातूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना संधी दिल्याने राज्यात, मराठवाड्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल तसेच लातूर जिल्ह्यात अनेक सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात असल्याने आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे.