28.4 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्र्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण भाजपात

माजी मंत्र्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण भाजपात

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसची गळती थांबण्याचे नावच घेईना. कारण मागच्या महिन्यात माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेला आणखी एक धक्का बसला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांनी आज धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

धाराशिव जिल्हा एकेकाळचा काँग्रेसचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा गड होता. मात्र दिवंगत आमदार माणिकराव खपले यांच्या निधनानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षही संपला. ज्या शेतकरी कामगार पक्षाला आणि पद्मसिंह पाटील यांना टक्कर देऊन मधुकरराव चव्हाण आणि माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांनी काँग्रेस पक्षाची बीजे धाराशिव जिल्ह्यात रोवली, त्या मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन धाराशिवमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

सुनिल चव्हाण यांची तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठी ताकद असून त्यांचे वडील मधुकरराव चव्हाण २५ वर्ष तुळजापूरचे आमदार होते. त्यांच्या या भाजप प्रवेशाने तुळजापूर तालुक्यामध्ये काँग्रेसला मोठे भगदाड पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR