कंधार : तालुक्यातील दिग्रस खुर्द येथे सौर ऊर्जेचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक उलटून शुक्रवारी रात्री ११:३० वाजताचे अपघात झाला. यात चालक शिवहरी दिगंबर भाले रा. सोमठाणा ता.मानवत यांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली.
घटनेचे थोडक्यात वृत्त असे की, दिनांक १५ मे २०२६ रोज शुक्रवारी भोकर येथून एमएच १४ डीएम ६६३६ हा ट्रक दि.१५ मे रोजी सौर ऊर्जेर्चे साहित्य घेऊन नांदेड उस्माननगर-फुलवळ-जांब मार्गे अक्कलकोटकडे जात होता.
कंधार तालुक्यातील दिग्रस (खुर्द) येथे रात्री ११:३० वाजताचे सुमारास चालकाच्या हलगर्जीपणामुळे व वाढत्या वेगामुळे ट्रकवरील ताबा सुटून सदरचा ट्रक उलटला. यात चालकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
















