लातूर : प्रतिनिधी
रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या येथील के. जी. एन. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रजिया शेख यांच्या स्मृती दिनानिमित्त के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल व नोबल सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत येथील इस्लामपुरा आयशा मस्जिद गल्ली नंबर ४ मधील डॉ. रजिया शेख क्लिनिकमध्ये घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग तपासणी शिबीरात ६२० गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. हमीद चौधरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमीर शेख होते. यावेळी डॉ. असद खान, डॉ. चाँद पटेल, डॉ. झिया सिद्दिकी, डॉ. राघवेंद्र देशमुख, डॉ. मन्सूर भोसगे, डॉ. अजीम मशायक, डॉ. सादिया शेख, डॉ. नाजीया शेख, डॉ. अब्दूल खय्युम, हाफीज शिराजूद्दीन पठाण, संजय गांधी निराधार समितीचे माजी चेअरमन हकीम शेख, एकमतचे उपसंपाद क एजाज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. हमीद चौधरी म्हणाले, रुग्णसेवा ही डॉक्टरांची प्राथमिकता असते. त्यामुळे काहींही झाले तरी रुग्णसेवा द्यावी लागते. स्वत: आजारी असो, की मध्यरात्र असो रुग्णसेवेसाठी सतत तयार असावेच लागते. पुर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध अतिश्य सलोख्याचे, विश्वासाचे होते. तो विश्वास डॉ. रजिया शेख यांची मिळवला होता. त्यांनी रुग्णसेवा वैद्यकीय सेवेतील प्रत्येक घटकांना प्रेरणादायी आहे.
यावेळी बोलताना डॉ. अमीर शेख यांनी डॉ. रजिया शेख यांच्या वैद्यकीय सेवेला उजाळा देत डॉ. रजिया शेख यांनी रुग्णसेवेच्या सांगीतलेल्या संकल्पनेनूसारच ईस्लामपुरा परिसरात डॉ. रजिया क्लिनिक सुरु करुन त्यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची रुग्णसेवा केली जात आहे. भविष्यात या ठिकाणी आणखी सुविधा वाढविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, डोळयांचे आजार, हाडांचे तज्ज्ञ, कान, नाक, घसा, जनरल सर्जन व जनरल मेडिसिन या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी ६२० गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नूर पठाण, गफार, मुनीर, अब्दुल वहीद, रिजवान पठाण, फार्मासिस्ट मोहम्मद शेख, रवींद्र पोलावार, सैफ शेख, सुहास जोशी, लॅब टेक्निशियन मोसेफ शिरगापुरे, अमीर सय्यद, जियाउद्दीन काजी यांच्यासह के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल व नोबल सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या स्टाफने सहकार्य केले.