22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुक्रेन हादरले, एकाचवेळी १०० ठिकाणी हल्ला

युक्रेन हादरले, एकाचवेळी १०० ठिकाणी हल्ला

 

कीव : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. युक्रेनच्या १०० ठिकाणांवर एकाचवेळी हल्ला केला. रशियाने अखेर टीयू-९५ विमानाचा वापर केला. हे रशियाचे अत्यंत घातक बॉम्बवर्षक विमान आहे. रशियाच्या या हल्ल्याला पलटवार म्हणून पाहिलं जात आहे. मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता.

रशियाच्या या हल्ल्यात कीवमधली डझनभरपेक्षा जास्त इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक इमारतींमध्ये हल्ल्यानंतर आग लागली. किती जिवीतहानी झाली, त्याबद्दल युक्रेनने खुलासा केलेला नाही. रशियाने इस्कंदर मिसाइलने हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनच मोठं नुकसान झालं. रशियाने पहिला हल्ला सकाळी ६:३० वाजता केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण कीवमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांनी बंकरचा आसरा घेतला आहे.

रशियाच्या या हल्ल्यावर झेलेंस्कीची प्रतिक्रिया आली आहे. रशियाने ४० पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. त्यात ३० मिसाइल्स नष्ट केल्याचे ते म्हणाले. ‘शत्रुने युक्रेनच्या जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला’ असं युक्रेनचे ऊर्जा मंत्री हलुशेंको यांनी फेसबुकवर लिहिले आहे. त्यांनी, नागरिकांना धोका असल्यामुळे आश्रय स्थळांमध्ये राहण्याची विनंती केली.

सरकारी ऊर्जा कंपनी उक्रेनेर्गोने खारकीव, सुमी, पोल्टावा, जापोरिज्जिया, निप्रॉपेट्रोस आणि किरोवोहराद क्षेत्रात आपातकालीन वीज कपातीची सूचना केली. कीवचे मेयर एंड्री सदोवी म्हणाले की, या हल्ल्यामध्ये क्रूज मिसाइल्सचा वापर करण्यात आला.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत. मात्र, अजूनही हे युद्ध थांबलेलं नाही. उलट दिवसेंदिवस अजून भीषण हल्ले सुरु आहेत. युक्रेनला लढण्यासाठी अमेरिका आणि नाटो देशांकडून रसद पुरवली जात आहे. अमेरिकेत पुढच्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. कारण पुतिन आणि ट्रम्प यांचे नाते लक्षात घेता अमेरिकेकडून युक्रेनला मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR