नांदेड : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर येथे पोलिस अधिका-यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ तसेच संबंधित दोषी पोलिस अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सदर घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी पोलिस अधिका-यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. लोकशाही मागार्ने आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची कारवाई होणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी पदाधिका-यांनी मांडली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव सत्यजीत बिरादार, नांदेड युवक काँग्रेस शहराध्यक्ष शंकर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव अभिलाष पावडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश पाटील कोकाटे, नांदेड शहर काँग्रेस उपाध्यक्ष अंबादास रातोळे, ठरवक जिल्हाध्यक्ष अक्षय नळगे,डॉ. भगवानराव मनूरकर,आशिष शिंदे, संजय कवठेकर, कार्यालयीन सचिव प्रकाश दीपके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोषी अधिका-यांवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास या प्रकरणी लोकशाही मागार्ने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
















