24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रराहुरीत ७० लाखांच्या बनावट नोटा जप्त

राहुरीत ७० लाखांच्या बनावट नोटा जप्त

राहुरी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचे रॅकेट उघड केले आहे. या मोठ्या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य, मशिन्स आणि एकूण ७० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुरीत बनावट नोटांचा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री राहुरी शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही संशयित व्यक्ती होंडा शाईन दुचाकी नंबर एम एच ४५ वाय ४८३३ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा बाळगून येत आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा विद्यालय समोर सापळा लावला.

संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार, राजेंद्र कोंडीबा चौगुले,  तात्या विश्वनाथ हजारे    यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणा-या नोटा मिळून आल्या आहेत. पोलिस निरीक्षक यांनी लगेच अ‍ॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR