25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रलवासामध्ये दरड कोसळली; चार जण बेपत्ता

लवासामध्ये दरड कोसळली; चार जण बेपत्ता

पुणे : मागील चोवीस तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पुण्यातील लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लवासामध्ये दोन व्हिलांवर दरड कोसळली आहे.

व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहात असल्याची माहिती मिळत आहे. चार लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरापासून जवळच असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. यात काही लोक बेपत्ता आहेत. अद्याप बचावपथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. त्याठिकाणचे स्थानिक लोक मदतीचे काम करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR