27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजना फडणवीसांचीच; मंत्री खाडे यांचे विधान

लाडकी बहीण योजना फडणवीसांचीच; मंत्री खाडे यांचे विधान

सातारा : प्रतिनिधी
मंत्री सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नाकावर टिच्चून लाडकी बहीण योजना ही फडणवीसांचीच असल्याचे सांगितले आहे. यावरून आता पुन्हा महायुतीतील श्रेयवाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या राज्यात लाडकी बहीण योजना खूप चर्चेत असून महायुतीमध्ये योजनेच्या श्रेयवादासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर अशातच लाडक्या बहिणीवरून महायुतीत कोणताही वाद नाही. या योजनेबद्दलचे अजित पवारांचे बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले, ते अजितदादांनी लावले नाहीत. ही योजना महायुतीचीच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, अजित पवार यांनी त्याला अर्थसाहाय्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून ही योजना बाहेर पडली आहे, असे भाजपचे मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले.

त्यामुळे ही योजना तिघांची म्हणजेच महायुतीचीच असून ती जनतेसाठीच आहे, असे स्पष्टीकरण कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. ही योजना बंद होणार नाही. विरोधक काहीतरी बोलून फुसका बार काढत आहेत. हे विरोधक भुरटे आहेत. जनतेने यांच्यावर विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

भाजप कामगार मोर्चा क-हाड दक्षिणच्या वतीने शिंदेवाडी-ंिवग (जि. सातारा) येथील बांधकाम कामगार संमेलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, भरत पाटील व मान्यवर उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो न लावता त्यांचेच फोटो लावले होते.

त्यामुळे त्या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू आहे का, या प्रश्नावर मंत्री खाडे म्हणाले, बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले. ही योजना महायुतीचीच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, अजित पवार यांनी त्याला अर्थसहाय्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून बाहेर पडलेली लाडकी बहीण योजना आहे. ही योजना महायुतीचीच असून ती तिघांची आहे, जनतेसाठीच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR