21.5 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रलातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांची बदली

लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांची बदली

साखर आयुक्त खेमनार यांचाही समावेश
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आज चार मोठ्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांचा समावेश आहे.

खेमनार यांची बदली मुंबईत एमआयडीसी सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली तर सागर यांची बदली भिवंडी-निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली. तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली. यासोबतच अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली तर लातूर जि. प.चे सीईओ अनमोल सागर यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात १३ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आणखी ४ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR