लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचे विश्लेषण करणारी नामांकित संस्था Frontiers in Co-operative Banking (FCBA) यांचेमार्फत दरवर्षी सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या बँकांना सन्मानित केले जाते. त्याअनुषंगाने FCBA, Mumbai यांनी राज्यांतील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या व अग्रगण्य लातूर जिल्हा बँकेस Best Cooperative Bank ½f Best Credit Initiative असे दोन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
लातूर जिल्हा मध्यमवर्ती सहकारी बँकेस साल सन २०२३-२४ या कालावधीतील उत्कृष्ट आर्थिक स्थिती, व्यवसाय वृध्दी, वार्षिक कर्ज वाटपाचे इष्टांका पेक्षा जादा वाटप, शासकीय योजनांची अंमलबजावणी, विविध कर्ज धोरणांची अंमलबजावणी, वसुली इत्यादीबाबत दोन पुरस्कार लखनौ उत्तरप्रदेश येथे ऋउइअ यांचे अधिकारी बाबू नायर व ठअऋरउडइ चे पदाधिकारी यांच्या हस्तेर् ९ ऑक्टोंबर रोजी शानदार सोहळ्यात देऊन बँकेला सन्मानित केले आहे. जिल्हा बँकेने ग्राहकांसाठी अद्ययावत ग्राहक सेवा व इतर विविध योजना राबवून सहकार क्षेत्रात एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि गेल्या ४१ वर्षापासुन सहकार क्षेत्रात राज्यात आघाडीवर आहे.
राज्याचे बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख व बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाभीमुख व्यवहार हाताळून बँकेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोन्ही पुरस्कारा बद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडून संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख तसेच संचालक मंडळ व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.