21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातूर महिला मोर्चाचा पुणे येथे सन्मान

लातूर महिला मोर्चाचा पुणे येथे सन्मान

लातूर : प्रतिनिधी
राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फी विथ माटी हा उपक्रम सबंध राज्यात राबविण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ही घेतली. त्याबद्दल हा विक्रम ज्यांच्यामुळे झाला त्यांचा सन्मान रविवारी करण्यात आला. सर्वाधिक सेल्फी विथ माटी घेण्याचा मान लातूर महिला मोर्चाला मिळाला होता. याबद्दल पुणे येथे रविवारी महिला मोर्चाचा गौरव करण्यात आला. लातूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिणी यादव यांनी हा गौरव स्वीकारला.

हा गौरव सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी लातूर महिला मोर्चाचा देखील सन्मान करण्यात आला. १६ ते ३० ऑक्टोबर यादरम्यान हे उपक्रम राज्यात राबवण्यात आले होते. ज्यात लातूर महिला मोर्चाच्या अध्यक्ष रागिणी यादव यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाने १७ हजार ५०० सेल्फी घेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. पुणे येथे महिला मोर्चाच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केल्याने महिला मोर्चाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR