31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रलातूरचे डॉ. बिलापट्टे यांना टेबल टेनिसमध्ये विजेतेपद

लातूरचे डॉ. बिलापट्टे यांना टेबल टेनिसमध्ये विजेतेपद

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेतही पारितोषिक
लातूर : प्रतिनिधी
इंडियन डेंटल असोसिएशन पुणे शाखेच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात राज्यभरातील अनेक दंत चिकित्सकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत लातूर येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. महेश बिलापट्टे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत टेबल टेनिसमध्ये एकेरी आणि दुहेरीत विजेतेपद, तसेच कॅरम स्पर्धेत एकेरीत उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील सोलारिस क्लब येथे रविवार, दि. १४ जुलै रोजी राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला. या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम आदी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, लातूर, छ. संभाजीनगर, नवी मुंबई, बारामती, संगमनेरसह विविध जिल्ह्यांतील ५५ दंत चिकित्सक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत लातूरचे प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. महेश बिलापट्टे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत टेबल टेनिसमध्ये एकेरी आणि दुहेरीत विजेतेपद पटकावले. तसेच कॅरम स्पर्धेतही उपविजेतपद मिळविले.

इंडियन डेंटल असोसिएशन पुणे शाखेचे अध्यक्ष डॉॅ. प्रशांत गावडे, सचिव डॉ. मंजिरी जोशी, क्रीडा सचिव डॉ. गायत्री मोरे यांनी या एक दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत दंत चिकित्सकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल विजेते, उपविजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR