लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न;गिरगांव चौपाटीवर भाविकांची गर्दी

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सांगता झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला.

मुंबई आणि पुण्यात शनिवारीही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा हा देशभरातील भाविकांसाठी लक्षणीय सोहळा असतो. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होत असतं. या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची जंगी मिरवणूक निघते. यावर्षी मुंबईत दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ११ पर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी सुरू झाली होती, त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगांवच्या समुद्रकिनारी दाखल झाला होता. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर लालबागच्या राजाचं गिरगांव चौपाटीवर विसर्जन संपन्न झालं आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचं २२ ते २३ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचं स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने विसर्जन पार पडलं आहे.

गिरगांव चौपाटीवर झाली होती मोठी गर्दी
ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोष आणि पाणावलेल्या डोळ्यांनी गणपतीला निरोप देण्यासाठी गिरगांव चौपाटीवर भाविकांचा जनसागर लोटला होता. गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती. परिसरात उत्साहाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.

पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे विसर्जन
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले आहे. बेलबाग चौकातून दुपारी ४ वाजता मिरवणूकीला सुरवात झाली होती. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती बप्पाचं विसर्जन रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी करण्यात आलं.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:28
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:45
Video thumbnail
🔴 LIVE -लातूरमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
28:39
Video thumbnail
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! 355 तालुक्यापैकी 265 तालुक्यात ट्रिगर 1 लागू
06:30
Video thumbnail
Sunetra Pawar|शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार
02:42
Video thumbnail
Latur|गुरुराज माऊलीच्या जयघोषात जळकोटमध्ये गणरायांना उत्साहात निरोप
00:48
Video thumbnail
Sunetra Pawar|दुष्काळाने शेतकरी हतबल; उपमुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
01:16
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
14:27
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
07:40
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
09:45
Video thumbnail
Nanded|मीनल पाटील आणि पती गजानन पाटील यांना नोटीस
01:16
Video thumbnail
Latur|शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश विसर्जनाचा जल्लोष
01:49
Video thumbnail
Latur कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अत्याचार;लातूरमध्ये धक्कादायक प्रकरण
07:21
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी मनपा सज्ज; १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
03:54
Video thumbnail
Latur|गणेश विसर्जनासाठी मनपाची तयारी; झोन ‘ड’ मध्ये मूर्ती संकलन केंद्र
01:21

Latest news