28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरवंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गुरुवारी जाहीर प्रवेश केला. सर्वांनी एकत्रित काम करुन जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढवू, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.
लातूर येथील काँग्रेस भवन येथे जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रमेश सूर्यवंशी, अनुप शेळके, सुशीलकुमार पाटील, अजय चक्रे, राज मस्के आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारिप पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व वंचितचे पदाधिकारी मारुती गायकवाड, वंचितचे माजी जिल्हा महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे, वंचितचे माजी तालुकाध्यक्ष अंकुश चिकटे, सत्यवान कांबळे, वंचितचे तालुका महासचिव सचिन सूर्यवंशी, बन्सी चक्रे, सुनील चक्रे, उद्धव सूर्यवंशी, समाधान कांबळे, बापूराव पौळ, राजाभाऊ भुतकर, बालाजी भूतकर, त्र्यंबक चिद्रे, राम चितलवाड, मुकूंद सूर्यवंशी, रंजित कांबळे, श्रीराम उपाडे, लखन वाघमारे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब गव्हाणे, महादेव उपाडे, नंदकुमार दासूद, करण वाघमारे, प्रदीप वाघमारे, बळीराम उपाडे, गोविंद चिकटे, बालाजी चिकटे, दयानंद चिकटे, गोपाळ चिकटे, नरसिंग चिकटे, अशोक चिकटे, उत्तम चिकटे, प्रदीप चिकटे आदीसह रेणापूर तालुक्यातील ईटी, खलंग्री, जवळगा, व्हटी, सांगवी, सय्यदपूर, सिंधगाव, खरोळा, घनसरगाव, धवेली, दवणगाव, कुंभारी आदी विविध गावातील वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR