18.1 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरवटसावित्री पौर्णिमेनिमित्त निसर्गोत्सव उत्साहात

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त निसर्गोत्सव उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
सह्याद्री देवराई, ग्रामपंचायत रामवाडी, ग्रामपंचायत झरी खुर्द आणि वन विभाग यांच्या सहभागाने  वटसावित्री पौर्णिमानिमित्ताने सह्याद्री देवराई रामवाडी झरी येथील ४०० वर्ष वयाच्या वडाच्या वटवृक्षाच्या सानिध्यात वटसवित्री पोर्णिमा साजरी करण्यात आली. ज्याने आठ पिढ्या बघितलेल्या त्या वटवृक्षाचे वडाचे ऋण व्यक्त करत वटसावित्री पोर्णिमा साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास रामवाडी, झरी खु., आजूबाजूच्या तांड्यांवरील महिलांचा २०० वड वटवृक्षाचे रोपटे  देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निसर्ग संवर्धनाची सामुहिक शपथ घेण्यात आली. तसेच  ४०० वर्ष वयाच्या वडाचे आणि मातांचे ऋण व्यक्त केले गेले. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा संदेश आई आणि झाड याच्यापेक्षा जगात मोठं कोणीही नाही. हा  संदेश वटसावित्री पौर्णिमा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून देण्यात आला.  सह्याद्री देवराई, ग्रामपंचायत रामवाडी , ग्रामपंचायत झरी खु व वनविभाग यांनी वटसावित्री पौर्णिमा निमित्त या परीसरात ११०० झाडांचे वृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला. आज २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .उप विभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे , चाकुर चे तहसीलदार नृंिसह जाधव , सह्याद्री देवराई लातूर चे समन्वयक सुपर्ण जगताप, रामवाडी सरपंच माधव नागरगोजे, झरीचे सरपंच युवराज  सूर्यवंशी, वन अधिकारी सुरेश म्हस्के यांच्या हस्ते पाच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळी सह्याद्री देवराई येथे, रामवाडी गावात, झरी खु. जिल्हा परिषद शाळा परीसरात,  वन विभाग नर्सरी येथे व नर्सरी ते शाळेच्या रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या सह्याद्री देवराई परिसरात रामवाडी, झरी आणि अनेक तांड्यांमध्ये एक आगळावेगळा निसर्गोत्सव करण्यात आला. यां  निसर्गोत्सवामध्ये आकाश, सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी आणि या मोठया चारशे वर्ष वयाच्या वडाचे ऋण व्यक्त्त करण्यात आले. अनेक दुर्मिळ वनस्पतींचा अधिवास असलेला हा परीसर हा अधिवास जतन करण्यासाठी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून दुर्मिळ वनस्पती वाचवण्यासाठी एक रिसर्च सेंटर शासनाच्या मदतीने उभा करण्याचा मानस आहे, असे यावेळी सुपर्ण जगताप म्हणाले. या वेगळ्यावेगळया निसर्गोत्सवात मला सहभागी होत आले मी हा क्षण कधीही विसरु शकणार नाही. मी या अशा उपक्रमात वेळोवेळी सहभागी होणार आहे
असे उप विभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे यावेळी म्हणाल्या. उप विभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे आणि सह्याद्री देवराई चे समन्वयक सुपर्ण जगताप यांच्या हस्ते दोनशे महिलांना शेतात ,गावात इतरत्र , घरासमोर लावण्यासाठी २०९ वडाचे रोपटे भेट देण्यात आली. लहान चिमुकल्या मुलांनी वडाच्या नावाने चांगभलं, आंब्याच्या नावाने चांगभलं म्हणत शाळा परिसरात वडाचे रोपटे हातात घेऊन दिंडी काढली. यावेळी सर्व गावक-यांनी, जिल्ह्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी निसर्ग वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.  या कार्यक्रमाला अहमदपूरचा  उप विभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे, चाकूरचे तहसीलदार नृसिंह जाधव, सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप, वनाधिकारी सुरेश म्हस्के, डॉ. बी. आर. पाटील, ग्रामपंचायत रामवाडीचे सरपंच माधव नागरगोजे, सरपंच श्रीमती प्रतिभा  सुर्यवंशी, युवराज सूर्यवंशी,  पूजा यलगटे, राहुल लोंढे, राजश्री कांबळे, आम्रपाली कांबळे, आजम पठाण, वैष्णवी मोरे, मीरा बोमने,  अमोल सूर्यवंशी  व अनेक पर्यावरण प्रेमी , गावकरी, महिला भगिनी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR