लातूर : प्रतीनिधी
शेतक-यांची आर्थिक उन्नती व जीवन समृद्ध व्हावे यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा नदीवर उभारलेल्या बराजमुळे मांजरा नदी शेतक-यांसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत बनली. परिणामी सिंचनाच्या क्षेत्रात हजारो हेक्टरची वाढ होऊन शेतक-यांच्या तीवनात समृद्धी आली, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. औसा तालुक्यातील भादा, काळमाथा, नकुलेश्वर बोरगाव येथे दि. २६ ऑक्टोबर रोजी महिलाची सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. याप्रसंगी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धीरज देशमुख, शितलताई फुटाणे, सईताई गोरे, पल्लवीताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
विलासरत्न विलासराव देशमुख यांनी शेतक-यांच्या हितासाठी मांजरा नदीवर बराज बांधून शेतक-यांना बारमाही पाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था निर्माण करुन दिली. त्यामुळे मांजरा पट्ट्यातील शेती, शेतकरी समृद्ध झाला. मांजरा पट्टा सुजलाम, सुफलाम झाला. मांजरा परिवारामुळे शेतक-यांची आर्थिक स्थिती सक्षम बनली. विकासाची ही घडी कामय अबाधित ठेवण्यासाठी तमाम मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीणचे उमेदवार आमदार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी वर्षाताई पाटील, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, मीरा हजारे, उज्वला पाटील, शामल गायकवाड, लताबाई श्ािंदे, सुवर्णा पाटील, रंजना गायकवाड, अंजना घोडके, जनाबाई बनसोडे, अलका हजारे, सिंधुताई श्ािंदे, शितलताई पाटील, जयश्री गायकवाड, सुंदरबाई गायकवाड, मंगलबाई भंगे, तसलीम शेख, मारुका कदम, नसीमा शेख, सुमनबाई गायकवाड, विमलबाई गायकवाड, निंबाबाई गायकवाड, सुलोचना मुळे, जयश्री मुळेकर, सुनंदाबाई गायकवाड, कमल गायकवाड, मिनाबाई गायकवाड, गीतांजली पाटील, रेश्मा रसाळ, राधा पाटील, ललिता साळुंके, अनुराधा वगैरे, भारतबाई बनसोडे, सुनिता साळुंखे, विजयाबाई उबाळे, अनिता उबाळे, विमलबाई रसाळ, सावित्री थोरात, वर्षा माने, दीर्घाबाई मस्के, अनिता झुंजारे, कल्पना वगैरे आदीसह महिला व पक्षाचे कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.