23.9 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमहाराष्ट्रशेजारच्या घराची भिंत कोसळून १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

शेजारच्या घराची भिंत कोसळून १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड होऊन संपूर्ण कुटुंब उघड्यावर आली आहेत.

बुधवारी मध्यरात्री १२ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत कन्नड शहरासह तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये एका घराची भिंत कोसळून १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
मृत मुलीचे नाव आयशा अशपाक शेख (वय १२, कन्नड) असे आहे. ही दुर्घटना मोहन रामप्रसाद भारुका आणि ओम रामप्रसाद भारुका यांच्या जुन्या घराची भिंत शेजारील अशफाक शेख यांच्या घरावर कोसळल्याने घडली. या दुर्घटनेत पेंटर काम करणारे अशपाक शेख, सादिया शेख, रिजवान शेख, जिसान शेख हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर उपविभागीय अधिकारी व नगर परिषद प्रशासक संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंडळ अधिकारी रमेश चव्हाण यांनी पंचनामा केला. मात्र, तलाठी नितीन मगरे हे घटनास्थळी अनुपस्थित होते, कारण ते सुटीवर गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR