22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाश्रीलंकेविरुध्दच्या टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, मोहम्मद सिराज झाला जखमी

श्रीलंकेविरुध्दच्या टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, मोहम्मद सिराज झाला जखमी

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका उद्यापासून म्हणजेच २७ जुलैपासून सुरू होत आहे. यानंतर भारत २ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मात्र याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जखमी झाला आहे. दुखापतीमुळे सिराज पहिल्या टी-२० ला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिराजला सरावादरम्यान उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचारही झाले. मात्र, सिराजची दुखापत किती गंभीर आहे आणि तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात केवळ ३ वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजशिवाय अर्शदीप सिंग आणि खलील अहमद हे संघात आहेत.

मोहम्मद सिराज २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळला होता. या मालिकेत त्याने स्पर्धेच्या सुरुवातीला केवळ तीन सामने खेळले आणि केवळ एक विकेट घेतली. आता तो पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही हे पहावे लागेल.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंका दौ-याचे वेळापत्रक

२७ जुलै – पहिला टी-२० सामना
२८ जुलै – दुसरा टी-२० सामना
३० जुलै – तिसरा टी-२० सामना

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR