यवतमाळ : प्रतिनिधी
वणी येथे शास्त्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळी झोपेत असताना बाप-लेकाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. यात एक वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दक्षित सुमित नेलावार असे मयत बालकाचे नाव आहे.
नेलावार दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह गाढ झोपेत असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अंथरुणात विषारी साप शिरला. सापाने बाप-लेकाला दंश केला. सर्पदंशानंतर वेदना अस झाल्याने चिमुरडा रडू लागला. मुलाच्या रडण्याने सर्वांना जाग आली.
झोपेतून उठून पाहिले असता वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले. तेथून दोघांनाही चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान चिमुरड्याचे दु:खद निधन झाले. तर वडील सुमित नेलावार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.