27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीतील कंपनीत वायू गळती; ३ ठार

सांगलीतील कंपनीत वायू गळती; ३ ठार

सांगली : प्रतिनिधी
सांगलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीमधील नमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२१ नोव्हेंबर) रात्री घडली.

९ जणांची तब्येत अद्याप ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील ७ जणांना रात्री तातडीने कराडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, यामधील काही जणांची तब्येत सुधारल्याने त्यांना उपचार करून सोडण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR