25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयसिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस

सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस

घरबसल्या पोर्ट होईल नंबर नवे सिम घेण्याची गरजच नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या मोबाईल आपली जीवनावश्यक गरज बनली आहे. . एखाद्या कंपनीचे सिमकार्ड दुस-या कंपनीत पोर्ट करायचे असेल तर कॅफे अथवा संबंधीत कंपनीच्या डीलरकडे जाण्याची गरज नाही. जर तुम्ही सिमकार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस केली आहे. आता तुम्ही सिम कार्ड विकत घेता किंवा ऑपरेटर बदलता तेव्हा तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे स्वत: व्हेरिफिकेशन करू शकता.

दूरसंचार विभागाने आपल्या अधिकृत हँडलवर ही माहिती दिली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी यूजरला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. दूरसंचार विभागाचा हा नवा नियम यूझर्सच्या वैयक्तिक कागदपत्रांसोबत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आहे. याशिवाय डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली लागू करण्यासाठी नवीन नियमही लागू करण्यात आले आहेत.

सिम कार्ड खरेदीसाठी नवीन नियम
दूरसंचार विभागाने यूझर्ससाठी ई-केवायसी सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे. तुम्ही कोणतीही फोटोकॉपी किंवा डॉक्यूमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकता. दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे यूझर्सच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. या नव्या नियमामुळे कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही. नवीन नियमानुसार, यूझर्सना त्यांचा नंबर प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये बदलण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. यूझर्स आता डळढ आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील.

आधारवरून सिम मिळेल
दूरसंचार विभागने केवायसी रिफॉर्ममध्ये आधार बेस्ड ई-केवायसी, सेल्फ केवायसी आणि ओटीपी बेस्ड सर्व्हिस स्विचची सुविधा सुरू केली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी यूझर्स आता फक्त आधार कार्ड वापरू शकणार आहेत. टेलिकॉम कंपन्या यूझर्सच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधार बेस्ड पेपरलेस व्हेरिफिकेशन फीचर वापरतील. यासाठी फक्त १ रुपये खर्च येईल. यासोबतच, दूरसंचार विभागाने यूझर्ससाठी त्यांच्या केवायसीची ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी सेल्फ केवायसीची सुविधाही सुरू केली आहे.

करा केवायसी स्वत: व्हेरिफाय
डीजी लॉकर वापरून यूझर्स त्यांचे केवायसी स्वत: व्हेरिफाय करू शकतील. कोणत्याही यूझरला त्याचा नंबर प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेडवर स्विच करायचा असेल तर त्याला टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. ते ओटीपी बेस्ड व्हेरिफिकेशन प्रोसेसच्या माध्यमातून कनेक्शन स्विच करू शकतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR