सेलू : प्रतिनिधी
सेलू शहराच्या शिवारातील जमीन नगरपरिषदेच्या हद्दीत येते त्यामुळे पिकविमा मंजुर करता येत नाही असे जुजबी कारण देत पिक विमा कंपनी ने सेलू शहर शिवारातील शेतक-यांना पिकविमा नाकारला असून त्यामुळे शहर शिवारातील शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहिले आहेत.
२०२४-२५ च्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला खरीप पिकाचा हंगाम पाऊसच न पडल्यामुळे बहरात आलेली उभी पिके वाळून गेली अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिकविमा केंद्रावर आपल्या पिकांचा पिकविमा काढला तसेच ई पिकपाहणी , पिकांचा स्पॉट पंचनामा असे सर्व सोपस्कार पूर्ण करूनही विमा कंपनीने न.प.शहर शिवार हद्द व शासनाचे निर्देश कारण देत व पिकविमा नाकारण्यात आल्याची माहिती पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी झाडे यांनी दिली.
तालुक कृषी अधिकारी काळे यांना विचारणा केली असता पिकविम्या बाबत अशा प्रकारचे शासनाचे कोणतेही निर्देश अथवा परिपत्रक नसल्याच स्पष्ट करून हा विषय पुढील कार्यवाही साठी कृषी आयुक्तांकडे पाठविण्याचे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले.
शेतक-यांच्या पिकविम्या बाबत लोम्बार्ड कंपनीचा मनमानी कारभार हा शेतक-याच्या फसवनुकीचा प्रकार असून तात्काळ चौकशी करून सर्व शेतक-यांना पिकविमा मिळवून द्यावा अशी मागणी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना करण्यात आली आहे.