चाकूर : प्रतिनिधी
सोयाबीन पीकाला पर्याय म्हणुन भुईमूगाचा पेरा रामबाणउपाय असल्याने तालूक्यातील घारोळा येथील शेतकरी यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचा पेरा केला असुन भुईमुग पीक जोमात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर यांच्यामार्फत घारोळा ता.चाकूर येथे भुईमूगाचे वाण टीएसजीएस-११५७ हे बियाणे पीक प्रात्यक्षिक म्हणून शेतक-याला गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रमुख एम.व्ही.धुपे, भुईमूगसंशोधक देशपांडे, कृषी अधिकारी मीरजकर, प्रगतीशील शेतकरी अशोकराव चिंते यांच्या उपस्थितीत घारोळा येथे शेतकर्याला शंभर टक्के अनुदानावर वितरीत करण्यात आले. हा भुईमुगाचा वाण २०१८ ला आंध्रप्रदेश तिरूपती युनिव्ह्ररसिटी येथे तयार झाला आहे. गेल्या चार, पाच, वर्षापासून सोयाबीनला भाव मिळत नाही. तसेच उत्पादनात पण घट झाली आहे. त्याला पर्याय म्हणुन आता शेतकरी भुईमूग, उडीद, मुग, तुर, तीळ अशा पीकाकडे शेतकरी वळला आहे.
यावेळी गावातील सौ.मीनाताई सुर्यवंशी, शिवाबाई सुर्यवंशी, आत्माराम शिंदे, लक्ष्मण बंडे, आतिक शेख, जन्नतबी शेख, कीसन जाधव, रुक्मीण कांबळे, वत्सला बनसोडे, सुभाष नेवाळे, मल्लीकार्जन उळागड्डे, बबीता बुक्के, अफसर शेख यांनी हा भईमुगाच्या वाणाचा पेरा शेतीत केला असुन हे पीक जोमात आहे.