22.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeराष्ट्रीयसोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार

सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार

नागपूर: प्रतिनिधी
‘सोयाबीन उत्पादक शेतक-यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल’, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार करता वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात ७१ अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतक-यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतक-यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात टाकणार, असे वचन दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR