28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रस्रेहल मला मुलीसारखी

स्रेहल मला मुलीसारखी

रायगड: महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले १ लाख १७ हजार ४४२ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्याविरोधात असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या स्रेहल जगताप २६ हजार मतांनी पराभूत झाल्या. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिस्पर्धी स्रेहल जगताप यांचं कौतुक केलं. म्हणाले स्रेहल मला मुलीसारखी.

कोकणात रायगड जिल्ह्यात महाड विधानसभा मतदारसंघातील भरत गोगावले यांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र महाड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असलेले आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्रेहल जगताप यांच्याबरोबरचा चर्चेचा एक मोठा किस्सा भरत गोगावले यांनी सांगितला आहे.

स्रेहल मला मुली सारखी आहे मतमोजणीच्या दिवशी ती माझ्या बाजूलाच बसली होती, त्यावेळेला मी तिला विचारलं तुला इतका कॉन्फिडन्स कसा आला ते सांग. मात्र तिनेही, मला पाच हजाराचे लीड मिळेल आणि मी विजयी होईन असं आत्मविश्वासाने सांगितलं मी म्हटलं ठीक आहेह्व. कारण मतमोजणीच्या पहिल्या केंद्रापासून आपल्याला लीड मिळेल हा ठाम विश्वास मला होता आणि तसंच झालं. महाड येथील एका आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पण निकाल लागला आणि माणगांव, गोरेगाव, लोणेरे या सगळीकडून मला जवळपास 11,000 ची लीड मिळाली आणि त्यानंतर स्रेहल ने मला सांगितलं की आता निघते जय महाराष्ट्र. तिने मला बुके देऊन शुभेच्छा दिल्या इतकंच नाही तर तीने मला, येताना मंत्रिपद घेऊन या अशा शुभेच्छाही दिल्याह्व. हा मतमोजणीच्या दिवशी घडलेला किस्सा भरत गोगावले यांनी सांगितला आहे.

भरत गोगावले यांनी पुढे सांगितले की, स्रेहलसोबत बोलताना मी तिला विचारले की तुमच्या करकर्त्यांना काही गावांत लोकांनी एन्ट्री च दिली नाही मग तुला लीड मिळेल असा विश्वास कसा वाटतो? तरीही तिला ५००० मताधिक्यचा विश्वास होता. पण विजयाचा निकाल माझ्याबाजूने लागला आणि निवडणूक आहे हार जीत होत असते असं सांगत स्रेहल यांनी मला शुभेच्छा दिल्या इतकंच नाही तर मला मंत्रीपदासाठी त्यांनी शुभेच्छा देत मंत्रीपद घेऊन या असेही सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR