४ महिने झाले तरीही रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे होईना

लातूर : प्रतिनिधी
तब्बल ४ महिन्यांपुर्वी म्हणजेच २ एप्रिल २०२६ रोजी महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत शहरातील गायब झालेले सर्व्हिस रोड आणि त्यावरील अतिक्रमणावर चर्चा होऊन रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्याचे आणि ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, ४ महिने होऊन गेली तरी रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे झाला नाही. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाची उच्चस्तरीय अधिका-यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यासंदर्भाने ‘एकमत’ने वृत्त मालिका सुरु केलेली आहे. त्याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी दि. २ एप्रिल २०२६ रोजी महापालिकेत अधिका-यांची बैठक घेत रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करुन ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे टाऊन प्लॅनिंग विभागात एकच खळबळ उडाली होती. परंतु, २ महिने होऊन गेली तरी रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्वे नाही.
८ दिवसांत सर्व्हे पूर्ण होईल लातूर शहरातील रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करुन ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने  टाऊन प्लॅनिंग विभागाला दिले होते. परंतु, ४ महिने झाले तरी सर्र्व्हे झाला नाही. याबाबत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टाऊन प्लॅनिंग विभागातील कर्मचा-यांची बदली झाली आहे. जे कर्मचारी आहेत त्यांना परत सूचना दिली आहे. या आठवड्यात रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे पूर्ण होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news