ताकदीच्या बळावर निर्णय लादण्याची पद्धत जुनी : जिनपिंग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्रिक्स समिट २०२६ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासोबतच ग्लोबल साउथच्या भूमिकेवर भर दिला. जग वेगाने बदल आहे, प्रत्येक जण कायमस्वरुपी बलवान राहू शकणार नाही. चीनच्या विदेश मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत शी जिनपिंग यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिक्स समिटच्या आयोजनबाबत आभार मानले. यावेळी त्यांनी सध्या जगाची स्थिती अस्थिर आहे. आता ताकदीच्या बळावर निर्णय लादण्याची पद्धत चालणार नाही, असे सांगत ब्रिक्स देशांनी पुढे येऊन सामूहिक नेतृत्व स्वीकारले पाहिजे, असे जिनपिंग म्हणाले.
विकसनशील देशांनी एकजूट करत जगात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी सकारात्मक ताकद म्हणून काम केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय नियम आणि समानतेवर जिनपिंग यांनी भर दिला. नियमांशिवाय जगाचा विचार केल्यास अराजकता आणि अव्यवस्था पसरेल. न्याय आणि निष्पक्षता प्रत्येक देशाची इच्छा असते. यामुळे जगाचे नियम एका बलवान देशाऐवजी सर्व देशांनी मिळून निश्चित करावेत, असे जिनपिंग म्हणाले.
ताकदीच्या बळावर आपले निर्णय मान्य करण्यास भाग पाडण्याची जुनी पद्धत आता चालणार नाही. विकसनशील देशांनी मिळून आंतरराष्ट्रीय नियमांचे संरक्षण केले पाहिजे. ज्यामध्ये प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व, एकमेकांच्या अंतर्गत विषयात दखल न देता वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा समावेश आहे. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कायदा सर्वांवर सारखाच लागू झाला पाहिजे. यामध्ये कोणताही दुहेरी मापदंड असू नये, असे जिनपिंग यांनी म्हटले.
सर्व देशांची भागीदारी महत्त्वाची
शी जिनपिंग यांनी म्हटलं की जगातील छोटा देश असो की मोठा देश, श्रीमंत देश असो की गरीब देश सर्वांना एकाच प्रकारच्या सन्मानाचा अधिकार आहे. विकसनशील देशांनी मल्टीपोलर (बहूपक्षवाद) आणि संयुक्त राष्ट्रांची भूमिका मजबूत केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय प्रकरणात सर्व देशांची भागीदारी समान असली पाहिजे. त्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने योग्य दिशेने सुधारणा कराव्यात, असे जिनपिंग म्हणाले.
















