लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी देशात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा यांचा विरोध करुन सामाजिक न्यायासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील त्यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.
लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती लातूरचे अध्यक्ष उमेश कांबळे, एकनाथ पाटील, बाबासाहेब गायकवाड, सचिन बंडापले, युनूस मोमीन, यशपाल कांबळे, भारत काळे, पद्माकर वाघमारे, सुंदर पाटील कव्हेकर, सुपर्ण जगताप, प्रा.प्रवीण कांबळे, किरण बनसोडे, गोपाळ बुरबुरे, डॉ.दिनेश नवगिरे
आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.