28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeक्रीडाआयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये फलंदाज सर्वाधिक चमकतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कमी चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतात. यामुळे आयपीएलमध्ये दरवर्षी येथे अनेक मोठे रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडले जातात. आयपीएलमध्ये अनेक फलंदाजांनी शतके झळकावली आहेत, आयपीएलमध्ये सर्वाधिक शकते ठोकणा-या पाच खेळाडूंमध्ये विराट कोहली सर्वाधिक ७ शतके ठोकून पहिल्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू

१. विराट कोहली

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सध्या विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ७ शतके झळकावली आहेत. याशिवाय विराटने आयपीएलमध्ये ५० हून अधिक अर्धशतकेही झळकावली आहेत. आयपीएल २०२४ मध्येही तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये २ अर्धशतके केली आहेत.

२.ख्रिस गेल

विराट कोहलीनंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकली आहेत. गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण ६ शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये सर्वांत मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी खेळली होती.

३. जोस बटलर
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणा-यांच्या यादीत इंग्लंडचा जोस बटलर तिस-या स्थानावर आहे. बटलरने आयपीएलमध्ये एकूण ५ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने १९ अर्धशतकेही केली आहेत.

४. के. एल. राहुल
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. राहुलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ४ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ३३ अर्धशतके झळकावली आहेत.

५. डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने १७६ सामन्यांत ४ शतके झळकावली आहेत. मात्र, वॉर्नरने या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत. वॉर्नरसोबतच शेन वॉटसनच्याही नावावर आयपीएलमध्ये ४ शतके आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR