33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन‘पुष्पा २’ मधील ‘श्रीवल्ली’चा फर्स्ट लूक आला समोर

‘पुष्पा २’ मधील ‘श्रीवल्ली’चा फर्स्ट लूक आला समोर

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देशभरातून मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुस-या भागाची घोषणा केली होती. आता अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या २८ व्या वाढदिवसानिमित्त सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी अभिनेत्रीच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. निर्मात्यांनी रश्मिका मंदानाचा पहिला लूक रिलीज केला आहे.

‘पुष्पा २’ च्या अधिकृत हँडलवरून चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, श्रीवल्ली ऊर्फ ​​रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ‘पुष्पा २ : द रुल’चा टीझर ८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर, हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. फर्स्ट लूकमध्ये रशिमकाला सेठानीच्या रूपात दाखविण्यात आले आहे.

निळ्या साडीमध्ये रश्मिका दागिन्यांनी मढलेली असून हातात बांगड्या घातल्या आहेत, या रूपात रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे. रश्मिकाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर मनोरंजन दुनियेत चांगलीच खळबळ उडाली आहे. तर रश्मिकाचे चाहते खांगलेच खुश झाले असून, रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असून, तिच्या फर्स्ट लूकला लाईक करून भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR