इंडिया आघाडीत फूट?

राजद, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा?, द्रमुकचा सावध पवित्रा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. एकीकडे कॉंग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुरेंद्रप्रसाद यादव यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. वाढती लोकसंख्या आणि विकासाचा वाढता ताण पाहता परिसीमन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यातच एनडीएचा घटक असलेल्या वायएसआर कॉंग्रेसनेही विधेयकाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे विधेयकाला पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, द्रमुक आणि शिवसेना ठाकरे गटाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा असल्याचे म्हटले. परंतु खासदार अमोल कोल्हे यांनी अद्याप विधेयकाचा ड्राफ्टच मिळाला नसल्याने पाठिंब्याचे आधीच सांगणार नाही, असे म्हटले. त्यामुळे यावरून राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती असल्याचे चित्र आहे.

लोकसभेच्या जागा वाढल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी अशा दोघांनाही होईल, असे राजद नेते सुरेंद्र प्रसाद यादव म्हणाले. देश आणि जगात लोकसंख्या वाढली असून, त्यामुळे विकासकामे आणि भौगोलिक क्षेत्रफळानुसार सरकारवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकसंख्या वाढीसोबतच संसाधने आणि विकासकामांचा भार वाढत चालल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात परिसीमन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यातच आज शरद पवार यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर शरद पवार गटाच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या डिलिमिटेशनला पाठिंबा असल्याचे म्हटले. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार आणि मुख्य व्हीप अमोल कोल्हे यांनी अद्याप ड्राफ समोर आलेला नाही. विधेयकाचा मसुदा बघून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे कोल्हे यांनी सांगितले. दुसरीकडे ठाकरे सेनेने मोदी सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध केला असला तरी खा. अरविंद सावंत यांनी विधेयकाला विरोधही नाही आणि समर्थनही नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनाही ऐनवेळी निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीचा
पक्षांतर्गत गोंधळ वाढला
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा डिलिमिटेशनच्या पाठिंब्यावरून पक्षांतर्गत गोंधळ वाढला. एकीकडे पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा असल्याचे जाहीर केले तर पक्षाचे मुख्य व्हीप खा. अमोल कोल्हे यांनी विधेयकाचा ड्राफ्ट वाचल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे म्हणत अप्रत्यक्ष आव्हाडांचा दावा खोडला. तसेच खा. सुप्रिया सुळे यांनीही विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगितले.

कॉंग्रेसचा विरोधच
केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी याला विरोध करण्याचे ठरविले आहे. विधेयक रोखण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसले तरी प्रत्येक स्तरावर लढा देऊ, असे राहुल गांधी यांनी म्हटले. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणत असल्याचा आरोप करीत पक्षाची विरोधी भूमिका स्पष्ट केली. कॉंग्रेसच्या संसदीय रणनिती समितीची बैठक कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आज पार पडली. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली.

इंडिया आघाडीची
आज बैठक होणार
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज काँग्रेसची बैठक पार पडली, या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते. या बैठकीत उद्या शनिवारी इंडिया आघाडीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रमुकलाही इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण पाठविले जाणार आहे. संसदेतील रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार असून सभागृहातील कामकाजासाठी संयुक्त रणनीती आखण्यात येईल, असे सांगण्यात आले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news