इमरान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबई : इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची चांगली चर्चा होती आणि थिएटरमध्ये दाखल होताच जोरदार कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने ८२ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. विशेष म्हणजे ‘आवारापन २’ने सनी देओलच्या ‘बंटवारा १९४७’लाही कमाईच्या बाबतीत मागे टाकल्याचे सांगितले जात आहे.

‘आवारापन २’ने पहिल्याच दिवशी २२ कोटी रुपयांची कमाई केली. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि तब्बल ३३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
तिस-या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईत दुस-या दिवसाच्या तुलनेत काहीशी घट झाली. मात्र तरीही चित्रपटाने चांगली कमाई केली.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आवारापन २’ने रविवारी २६.५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांतील चित्रपटाची एकूण नेट कमाई ८२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘धमाल ४’ला मागे टाकत मोठा विक्रम
‘आवारापन २’ने ओपनिंग वीकेंडच्या कमाईत अजय देवगणच्या ‘धमाल ४’ला मागे टाकले आहे. ‘धमाल ४’ने ओपनिंग वीकेंडमध्ये ६७.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘आवारापन २’ने तीन दिवसांत ८२ कोटींची कमाई करत यावर्षीच्या सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

यादीत ‘धुरंधर २’ ४६६ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर, तर ‘बॉर्डर २’ १२९.८९ कोटी रुपयांसह दुस-या क्रमांकावर आहे.

१०० कोटींच्या क्लबच्या दिशेने वाटचाल
तीन दिवसांत ८२ कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आता ‘आवारापन २’ १०० कोटींच्या क्लबच्या जवळ पोहोचला आहे. चित्रपटाची सध्याची कमाई पाहता लवकरच तो १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत ‘मैं वापस आऊंगा’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘पति पत्नी और वो दो’ यांसारख्या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे.

हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘आवारापन’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागाला नंतर कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला होता, मात्र रिलीजच्या वेळी त्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नव्हते. ‘आवारापन २’मध्ये इमरान हाश्मीसोबत दिशा पटानी, शबाना आझमी आणि पूरन गब्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news