34.3 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूरउदगीरात गहू तांदूळ  काळ्या बाजारात! 

उदगीरात गहू तांदूळ  काळ्या बाजारात! 

उदगीर : बबन कांबळे
अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राशन धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे.  शासनाचे धान्य घ्यायचे आणि खरेदीदारांना २० रुपये ते २३ रुपये प्रमाणे विक्री करण्याचा गोरख धंदा उदगीर शहरासह ग्रामीण भागात सुरू झाला आहे. शासमान्य दुकानातून दर महिन्याला शासनाचा कोठा गोरगरिबांसाठी वाटला जातो. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे मोफत व अल्प दरातील शिधापत्रिका धारकाकडून दोन रुपये किलो मिळणारे हे धान्य उदगीरच्या बाजारपेठेत २२ रुपये ते २३ रुपये किलो प्रमाणे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही मोजक्या दुकानात विकले जात असल्याचे समोर येत आहे.
शासनमान्य दुकानातून गहू, तांदूळ तर कधी चणाडाळ आणि साखर मिळते हे सर्व धान्य घरी न वापरता अनेक लाभार्थी अधिकच्या दराने खरेदी विक्री करण्यासाठी शहरातील व्यापा-यांना विक्री करतात. यात काळाबाजार असल्याचे सर्वांना दिसून येत आहे.  खरेदी करणारे व्यापारी हे उदगीर शहरात ठीक ठिकाणी आपला व्यापार मांडून बसले आहेत. गहू, तांदूळ गाड्या भरून काळ्या बाजारात दररोज सरसपणे खरेदी -वक्रीचा व्यापार करीत आहेत. शासनाचे गहू, तांदूळ खरेदी करण्यासाठी ही बंधन नसल्याकारणाने धान्य खरेदीदार मालामाल होत आहेत. यातील खरेदी दारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे. राशेनचे घेतलेले धान्य पॉलीस करून पुन्हा चढ्या दराने विक्री केली जात असल्याची ही चर्चा उदगीर शहरात होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR