‘एसआयआर’मुळे पुणे महापालिकेच्या विकासकामांवर परिणाम…!

पुणे : प्रतिनिधी
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी पुणे महापालिकेचे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील विकासकामांच्या गतीवर परिणाम झाल्याची स्पष्ट कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. महापालिकेचे जवळपास ८० टक्के मनुष्यबळ एसआयआरच्या कामात गुंतल्याने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम तसेच नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींच्या निवारणालाही फटका बसल्याचे त्यांनी मान्य केले.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार निश्चित कालमर्यादेत ‘एसआयआर’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे ८० टक्के मनुष्यबळ या कामासाठी देण्यात आले आहे. परिणामी पथ, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम आणि इतर विभागांतील नियमित कामांवर त्याचा थेट परिणाम झाला. अनेक अधिकारी क्षेत्रीय पाहणीऐवजी एसआयआरच्या कामात व्यस्त असल्याने विकासकामांचा वेग कमी झाला आहे.

महापालिकेने गेल्या काही महिन्यांत विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या असल्या, तरी मनुष्यबळाअभावी याची अंमलबजावणी अपेक्षित वेगाने झालेली नाही. त्यामागे मनुष्यबळाची कमतरता आणि एसआयआरमधील व्यस्तता ही दोन प्रमुख कारणे असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने आता एसआयआरचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांना पुन्हा विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news