27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रऔरंगजेबाचे कौतुक करणा-या अबू आझमींचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

औरंगजेबाचे कौतुक करणा-या अबू आझमींचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दणाणले

मुंबई : प्रतिनिधी
अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांचे अधिवेशन काळात निलंबन करावे, असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अबू आझमी यांचे फक्त निलंबन करून चालणार नाही, तर त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.

अबू आझमी यांच्या अधिवेशनातील निलंबनाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा सभागृहात गदारोळ झाला. दोन्ही बाजूकडील आमदारांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणा-या महाराष्ट्रातील प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी विरोधकांनी मागणी केली.

विधानसभा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांच्या जवळ आमदार एकत्र येत त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR