कपाळावर चंद्रकोर…नजरेत अनेक अनुत्तरित प्रश्न, रिंकू राजगुरूच्या जिजाई चं नवं पोस्टर चर्चेत!

मुंबई : कपाळावर लाल चंद्रकोर …डोळ्यांत एक वेगळीच चमक… आणि अशी नजर, जणू तिला काहीतरी सांगायचंय ! रिंकू राजगुरूच्या या नजरेमागची गोष्ट नेमकी काय, असा प्रश्न उपस्थित करणारं जिजाई या आगामी मराठी चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टरमध्ये रिंकूचे डोळेच जणू या कथेची पहिली झलक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी जिजाई चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

पोस्टरमध्ये रिंकूचा संपूर्ण चेहरा न दाखवता तिचे डोळे आणि कपाळावरील लाल चंद्रकोर यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तिच्या डोळ्यांतील बोलकेपणा, चेहऱ्यावर पडणारा प्रकाश यामुळे पोस्टरला एक वेगळीच दृश्यात्मक ताकद मिळाली आहे. सोनेरी अक्षरांतील जिजाई हे शीर्षकही लक्ष वेधून घेतं. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेची झलक मिळत असली तरी रिंकूची व्यक्तिरेखा नेमकी कोणती, तिच्या कपाळावरील चंद्रकोरीचं महत्त्व काय आणि तिच्या नजरेतून कोणती गोष्ट सांगितली जाणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती तर कोकोनट फिल्म्सने सहनिर्मिती केली आहे.

दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणतात, प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची एक गोष्ट असते आणि ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद चित्रपटाच्या मांडणीत असते. जिजाई च्या बाबतीतही आम्ही काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात हा चित्रपट आजच्या स्त्रीचा आहे. जी लढवय्या आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांना कथेची उत्सुकता वाटावी आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा होती. रिंकूने या भूमिकेला दिलेला न्याय आणि चित्रपटातील तिचं रूप प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असेल.ह्व

झी स्टुडिओजचे मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात,  झी स्टुडिओज नेहमीच वेगळ्या आशयाच्या आणि प्रेक्षकांना नव्या अनुभवाची ओळख करून देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देत आलं आहे. जिजाई हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. रिंकू राजगुरूसारखी गुणी अभिनेत्री आणि नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.

नुपूर गुहा, तुषार राऊत सहनिर्मित या चित्रपटात रिंकू राजगुरूसह आणखी कोणते चेहरे झळकणार याचीही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, जिजाई च्या या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिका नक्कीच सुरू केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news