17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रगृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवे; हाकेंची महायुतीकडे मागणी

गृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवे; हाकेंची महायुतीकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ केला. तब्बल २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्रि­पदाची शर्यतही अटातटीची झाली आहे.

महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वातही खल सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवे. अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, जरांगेंना लोक कंटाळले आहेत. १३० जागा पाडायची भाषा केली होती त्यांनी. जिथे मेसेज दिला तिथे लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटे बोलत आहे. पण मी जिथे सभा घेतल्या तिकडच्या उमेदवारांना चांगली मतं पडली आहेत.

लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडले. लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो.

लक्ष्मण हाके म्हणाले की, मला विधानपरिषदच काय, कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रात काय तर द्यायला हवे. अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व मी करतोय. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेली मागणी आता महायुती पूर्ण करते की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR