15.3 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeक्रीडागौतम गंभीर होणार टीम इंडियाचा हेड कोच?

गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा हेड कोच?

मुंबई : प्रतिनिधी
गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गौतम गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्याने यशस्वी काम केले. आयपीएल २०२४ च्या विजेत्या कोलकाता संघाचा गौतम गंभीर मेंटॉर होता. आता गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध सुरु झाला होता. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने गौतम गंभीर यालाही अर्ज करण्याचा आग्रह केला होता. गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते. गौतम गंभीर आणि जय शाह यांच्यात २६ मे रोजी चेन्नईत दीर्घ चर्चा झाल्याचे समजते.

एका आयपीएल संघ मालकाने गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती दिली. त्या संघमालकाच्या मते गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक असेल. बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. त्यामुळे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तथापि, गौतम गंभीर याचा तगडा अनुभव पाहता गंभीरबाबत शक्यता बळावली आहे.

गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. २०२२-२०२३ आयपीएल हंगामात गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर होता. लखनौची कामगिरी शानदार झाली होती. आयपीएल २०२४ हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात होता. गौतम गंभीर मेंटॉर असताना लखनौ संघ दोन वर्षे प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. यंदा कोलकाताने चषकावर नाव कोरले. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा कोलकाता पहिला संघ ठरला होता.

आंतरराष्ट्रीय करिअर
गौतम गंभीरचे आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिले आहे. त्याने टीम इंडियासाठी १४७ वनडे सामने खेळले. त्यामध्ये ५२३८ धावा केल्या. वनडेमध्ये गौतम गंभीरने ११ शतके आणि ३४ अर्धशतके ठोकली. गौतम गंभीर टीम इंडियासाठी ५८ कसोटी सामने खेळला. यामध्ये ४१५४ धावा केल्या आहेत. कसोटीत गौतम गंभीरने ९ शतके आणि २२ अर्धशतके ठोकली.

वर्ल्डकपमध्येही
गंभीरचा मोठा वाटा
कसोटीमध्येही गौतम गंभीरने द्विशतकही ठोकले. गौतम गंभीर याने ३७ टी-२० सामनेही खेळले आहेत. यामध्ये ९३२ धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. २००७ टी-२० वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR