28.2 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रमोदींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मोदींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुंबई : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी धमकी देणा-याचा कसून शोध घेतला. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ च्या सुमारास धमकीचा फोन आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणा-या व्यक्तीने पोलिसांना दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. फोन करणा-या व्यक्तीचा पोलिसांनी कसून तपास सुरु केला. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. दरम्यान, या महिलेची विचारपूस केली असता कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. परंतु या धमकीमुळए मुंबईत खळबळ उडाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR