25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeलातूरघरावरील पत्रे उडाले; झाडे, पोल कोसळले

घरावरील पत्रे उडाले; झाडे, पोल कोसळले

रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यात सोमवारी दि. ९ जुन रोजी रात्री वादळी वा-यासह तुफान पाऊस झाला रेणापूर ७० मि मि  व कारेपूर महसूल मंडळात ७५ मि मि पावासाची नोंद झाली. या पावसामुळे शेती चे मोठे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे अनेक गावात घरावरील पत्रे उडाली तर झाडे व विजेचे खांब कोसळ्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे.
    रेणापूर तालुक्यात यंदा १३ मे पासुनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास १५ दिवस सातत्याने मान्सून पूर्व पावसाने झोडपले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात नदी, नाल्यांना पूर आला. यापूराचे पाणी  शेतात शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वादळी वा-यामुळे गव्हाण, समसापूर , इंदरठाणा आदी गावातील घरांवरील पत्रे उडून गेली त्यामुळे घरांचे  तसेच झाडे व विजेचे पोल कोसळ्याने नुकसान झाले होते. इंदरठणा या गावात विज कोसळून एका सालगड्याचा  मृत्यू झाला होता . दरम्यान १ ते ८ जुन दरम्यान पावसाने थोडी विश्रांती घेतल्या नंतर सोमवारी दि . ९ जुन रोजी रात्री पुन्हा अचानक रौद्ररूप धारण करत विजेच्या कडकडाटासह व तुफान वादळी वा-यासह दमदार हजेरी लावली.
रेणापूर महसुल मंडळात ७० मि . मि. व कारेपूर महसूल मंडळात ७५ मि मि. पावसाची नोंद झाली. वादळी वा-यासह झालेल्या पावसाने नदी, नाले ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी पूराचे पाणी शेतात शिरल्याने शेती चे नुकसान झाले तसेच वळणे फुटली गेली. तुफान वादळी वा-यामुळे   रेणापूर शहरात, कारेपूर व परिसरात, पळशी, निवाडा, दर्जी बोरगाव, काळेवाडी बावची  आदी गावात घरावरील पत्रे उडून गेली. लहान-मोठी झाडे उन्मळून पडली त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.
काळेवाडी येथील सदाशिव बंडे यांच्या शेतातील पर्त्याचे शेड जामिनदोस्त झाल्याने नुकसान झाले तसेच या वादळात  दर्जी बोरगाव येथील शेतकरी सुचिता भास्कर फड याचे शेतातील शेड पत्र उडून गेली त्यांचे मोठे नुकसान झाले  एकूणच सोमवारी रात्री तुफानी वा-यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR