16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयचंदिगढमध्ये भाजपची हॅट्ट्रिक

चंदिगढमध्ये भाजपची हॅट्ट्रिक

चंदिगढ : वृत्तसंस्था
चंदिगढ या केंद्रशासित प्रदेशात शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक जून रोजी मतदान होत आहे. चंदिगढ मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार बदलल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.

काँग्रेसने गतवेळचे उमेदवार पवन बन्सल यांना डावलत मनीष तिवारी यांना संधी दिली आहे. तर भाजपने अभिनेत्री किरण खेर यांचे तिकिट कापत संजय टंडन यांना मैदानात उतरवले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी सलग दोन निवडणुकांत या ठिकाणी विजय मिळवला होता.

मात्र मतदारसंघात त्या फारशा फिरकत नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचे तिकिट कापले. मतदानाची तारीख तोंडावर असली तरी चंदिगढमध्ये निवडणूक असल्याचे वातावरण नाही. गतवेळच्या निवडणुकीत पक्षांनी राष्ट्रीय मुद्यांवर भर दिला होता. यावेळी बेरोजगारी, महागाई आणि स्थानिक मुद्दे प्रचारात अग्रस्थानी आहेत. महत्त्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन आपले मुद्दे पटवून देण्याचे काम प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते करीत आहेत.

चंदिगढ मतदारसंघात सर्वप्रथम १९६७ मध्ये निवडणूक झाली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन बन्सल यांनी चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात एका हॅट्ट्रिकचा समावेश आहे. मात्र त्यानंतर सलग दोनदा त्यांना किरण खेर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना राष्ट्रीय राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. केंद्रात मंत्री म्हणून तसेच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केले आहे. या अनुभवाचा प्रचारात पुरेपूर वापर करण्याचा तिवारी यांचा प्रयत्न आहे. स्थानिक समस्यांवर समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान तिवारी यांनी टंडन यांना दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR