जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या व्यवहारावरून पटोले यांनी सरकारला जाब विचारला. वाळूच्या विषयावर भाजपचेच नेते बोलत असल्याचे सांगत त्यांनी या कथित हजारो कोटींच्या प्रकरणात कोणाला पाठबळ मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला.

शासनच याला जबाबदार असते आणि शासनानेच यामध्ये भूमिका घ्यायची आहे, असे पटोले म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: भंडा-याच्या शेजारील जिल्ह्यातील मंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती आपण महसूल मंर्त्यांना दिली असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. कुंपणच शेत खातंय. जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात, हे पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. नकली किंवा संशयास्पद निविदा काढून त्यातून कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचे चित्र असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या मते, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जात आहे. मात्र या पैशांचा योग्य वापर होण्याऐवजी त्यात कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news