सीआरपीएफच्या वाहनाला भीषण अपघात

श्रीनगर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड परिसरामध्ये मंगळवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. ट्रक (क्र. जेके ०२ डीयू-४३८६) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) मिनी-ट्रकमध्ये (क्र. जेके ०२ सीजी ५७९५) झालेल्या समोरासमोर धडकेत सीआरपीएफच्या पाच जवानांसह एकूण ७ जण जखमी झाले आहेत.

ट्रक आणि सीआरपीएफच्या वाहनामध्ये झालेला हा अपघात लेव्हडोरा भागात घडला. सीआरपीएफच्या वाहनाला समोरून येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सीआरपीएफच्या ४ अधिका-यांसह ५ जवान आणि ट्रकचा चालक व वाहक जखमी झाले आहेत. इन्स्पेक्टर राज कुमार तिवारी, एसआय/जीडी राजेंद्र सिंह, एएसआय/जीडी लवेंडे, एएसआय/जीडी उमेश कुमार, हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हर वीरेंद्र अशी जखमी जवानांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीमुळे आणि कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news