जागतिक पर्यावरणदिनी आज १० हजार झाडांचा वाढदिवस

लातूर : प्रतिनिधी
लातूर वृक्ष चळवळीने लातूर शहरात ५ जून ते १५ जुलै २०१६ ला सुमारे १०  हजार झाडे लावली. केवळ लावलीच नाही तर ती जगवली. आता ती झाडे मोठी दहा वर्षाची झाली आहेत. या झाडांचा दहावा वाढदिवस ५ जून रोजी लातूर शहरातील येथील स्टीम एजयुकेशन, पाटील प्लाझा जवळ, औसा रोड लातूर येथे सकाळी साजरा करण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला लातूर मनपाच्या आयुक्त मानसी मीना उपस्थित राहणार आहेत. शिवाय शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती लातूर वृक्ष चळवळ आणि सह्याद्री देवराईचे समन्वयक, पर्यावरण प्रेमी सुपर्ण जगताप यांनी दिली आहे.
झाडांच्या वाढदिवसानिमित्त शहरातून वृक्षदिंडी काढून लहान मुलांकडून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिनिधिक वृक्षारोपण करून काही झाडं लावली जाणार असून वृक्षारोपणाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. तरुण मुलं-मुली बेटावर जाऊन प्लास्टिक उचलणार आहेत. दुर्मिळ वनस्पती व बीज संकलन करणार आहेत. सह्याद्री देवराईला भेट व वृक्षारोपण.केले जाणार आहे. मनपा आयुक्त या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहणार आहेत. लातूर वृक्ष चळवळ, सह्याद्री देवराई, स्टीम एज्युकेशन, ऋत फाउंडेशन, स्रेहसृजन फाउंडेशन, सनराईज सामाजिक संस्था, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी या सर्व संस्था पर्यावरण उपक्रमात सहभागी होणार आहेत. लातूर वक्ष चळवळ ज्याने शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. अशी माहिती सह्याद्री देवराई व लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी दिली. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी जास्तीत जास्त संख्येत विविध उपक्रमात सहभाग  घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लातूर वृक्ष चळवळ गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत आहे. लातूर जिल्ह्यात ६ सह्याद्री देवराया उभ्या केल्या आहेत. चाकूर तालुक्यातील रामवाडी झरी, नागराळ उदगीर येथे मांजरा देवराई, बोकनगाव लातूर तालुक्यातील देवीच्या डोंगरावरील देवराई, चिलवंतवाडी औराद शहाजनी जवळ आणि सहावी हासेगाव औसा तालुक्यातील देवराई प्रकल्प उभारले
आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news