लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लातूर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दमदार विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून जिल्हा परिषदमध्ये ठरलेला. जिल्ह्यातील सर्व नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, काँग्रेस पदाधिका-यांनी मंगळवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्व नूतन सदस्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सर्व मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान सकाळपासून आशियाना निवासस्थानी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नवनिर्वाचित सदस्यांनी आनंद साजरा करत आशियाना निवासस्थान गर्दीने खचाखच भरलेले दिसत होते.
यावेळी माजी आमदार, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार तथा विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड. प्रवीण पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई भिसे, सौ. अश्विनी शिंदे, सौ. भागीरथी पाटील, सौ. मनीषा कदम, सौ. दीपाली भोसले, सौ. दिपाली आदमाने, सौ. रुपाली वाघमारे, सौ. नागेश्वरी केंद्रे, शांताबाई अदावले, जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, बाळू (श्रीकांत) माने, दत्तात्रय टेकाळे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण पाटील, बाळासाहेब कदम, अक्षय देशमुख, महेश चव्हाण, विलास उपाडे, सौ. शरयू गायकवाड, सौ. शिवानी शिंदे, पूजा जाधव, सौ. दिपाली कराड, उद्धव जाधव, बालाजी गोटके, सौ. मिरा सूर्यवंशी, राजेश केंद्रे, श्रीकांत बैले यांच्यासह जळकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील, सचिन पाटील, रवींद्र काळे, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, शिवाजी कांबळे, दयानंद बिडवे,्र श्रीकृष्ण काळे , सुरेश चव्हाण, बाबुराव जाधव, दत्ता शिंदे, सचिन शिंदे, बचाटे, अमोल भिसे, संभाजी रेड्डी, गणपतराव बाजुळगे, मकबूल वलांडीकर, चाँदपशा इनामदार, प्रा. शशिकांत कदम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

