दुबार मतदारांची एसआयआर प्रक्रियेत नावे वगळा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

सातारा : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील यादीमध्ये ५६ हजारहून अधिक दुबार, स्थलांतरित आणि संशयित मतदारांच्या नोंदी असल्याचा गंभीर मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि त्रुटीरहितपणा हा मुक्त, निष्पक्ष व विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत दुबार आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने सातारा जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात दुबार मतदारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने दुबार आणि बोगस मतदारांचा प्रश्न कायम असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मतदारांची आकडेवारी केली सादर : पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधील मतदार यादीचे संगणकीय विश्लेषण केले आहे. त्यानुसार २१ हजार १३२ मतदारांच्या नावांची तब्बल ४८ हजार ७४१ वेळा नोंद आढळून आली आहे. त्यामुळे सुमारे २७ हजार ६०९ दुबार नोंदी असण्याची शक्यता आहे. याशिवाय कराड दक्षिणला लागून असलेल्या कराड उत्तर, इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस-कडेगाव या पाच विधानसभा मतदारसंघांतील २८ हजार ५०९ मतदारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत असल्याचा संशय आहे. या सर्व नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुबार मतदार नावे वगळावीत
मतदाराचे नाव, मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि अनुक्रमांकासह कराड दक्षिणच्या मतदार यादीतील एकूण ५६ हजार ११८ संशयित दुबार अथवा स्थलांतरित नोंदींची सविस्तर यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सादर केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत सर्व दुबार, स्थलांतरित व संशयित नोंदींची सखोल पडताळणी करून नियमबा व अपात्र नावे नव्या मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

कार्यवाहीची सविस्तर माहिती द्या
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात निवेदने दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कोणती कार्यवाही केली, त्याची सविस्तर माहिती देण्याची मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news