दोन डॉक्टरांसह रुग्णवाहिकेचे दोन चालक निलंबित

परभणी : जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जिंतूर येथील गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रुग्णवाहिका सेवा पुरविणा-या सुमित कंपनीतील २ डॉक्टरांसह २ रुग्णवाहिका चालकांना सोमवारी रात्री निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परभणीच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक दयानंद मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीने दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी परभणीतील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल होत सदस्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून घटनेशी संबंधित विविध बाबींची माहिती घेत चौकशीला सुरुवात केली. मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षात संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच घटनेशी निगडित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास झालेला विलंब, संबंधित कर्मचा-यांची भूमिका, रुग्णवाहिका सेवेशी झालेला संपर्क आणि रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली का, यासह विविध बाबींची समितीकडून पडताळणी करण्यात येत आहे. मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत.

या प्रकरणी रुग्णवाहिका सेवेतील डॉ. कुलदीप चोरमले, डॉ. अभिजीत इप्पर तसेच रुग्णवाहिका चालक मोहम्मद जलाल आणि केशव यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सुमित कंपनीच्या अधिका-यांनी या सर्वांच्या निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती आहे. चौकशी समितीने संबंधितांची तब्बल २ तास कसून चौकशी केली. या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. रुग्णवाहिका सेवेत हलगर्जीपणा का झाला याचा शोध घेण्यावर समितीचा भर आहे. या प्रकरणातील अंतिम जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी समितीचा सविस्तर अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या अंतिम अहवालानंतर आणखी कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news